भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे : अतिवृष्टीमुळे सिलिगचे नुकसान

    वेंगुर्ला नगरपरिषदमधील आपल्या दालनातील प्लास्टर ऑफ पॅरीसमध्ये केलेला सिलिगचा काही भाग हा अतिवृष्टीमुळे कोसळला आहे. या नुकसानीसंदर्भात संबंधित ठेकेदारोन विनामोबदला ते काम करुन देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचाराचे केले जाणारे आरोप हे चुकीचे असल्याची माहिती नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

      त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कीया इमारतीच्या शेजारी नगरपरिषदेची जुनी स्टोअर रुम आणि गेस्ट हाऊस अस्तित्त्वात होते. परंतु व्यापारी संकुलाचे बांधकाम करताना ही इमारत सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने निर्लेखित करुन ती पाडण्यात आली. त्यामुळे प्रत्यक्ष पावसाच्या पाण्याचा मारा प्रशासकीय इमारतीच्या या भितीवर बसू लागला. ही बाब लक्षात आल्यावर ह्या भितीचे पावसापासून संरक्षण व्हावे तसेच प्रशासकीय इमारतीच्या बाह्य सौंदर्यात भर पडावी या दुहेरी उद्देशाने एसीपी शिटस्चे पॅनलिग करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. निधीच तरतूद करुन प्रशासकीय मान्यता मिळणे आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करुन या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. परंतु कोविड-१९च्या कालावधीमध्ये लॉकडॉऊनमुळे या संपूर्ण प्रक्रियेला विलंब झाला आहे. पण लवकरात लवकर या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेमुळे या भितीवर बसणारा प्रत्यक्ष पाण्याचा  होणारा मारा रोखण्यास मदत होणार आहे आणि आतील इमारतीच्या फर्निचरचे नुकसान टळणार आहे.

      सध्यस्थितीमध्ये नगराध्यक्ष दालनाचे झालेले नुकसान संबंधित ठेकेदार विनामोबदला करुन देण्यास तयार आहे. तसेच निर्देश ठेकेदारास देण्यात आले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामामध्ये भ्रष्टाचाराचे होणारे आरोप हे चुकीचे आहे. खराब झालेले काम ठेकेदाराकडून या आठवड्यात पूर्ण करुन घेतले जाणार असल्याचे नगराध्यक्ष गिरप स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Close Menu