►वेंगुर्ला शहरात भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला शहरात काल रात्री १ भाजी व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. दरम्यानत्याच्या भावाचा स्वॅब टेस्ट घेण्यात आला असून त्यांचा रिपोर्ट अद्याप प्राप्त झाला नाही. आज सकाळी प्रशासनाकडून भाजी विक्रेते रहात असलेला ५० मिटर परिसर हा कंटेन्मेंट तर बाजूचा १०० मिटरचा परिसर हा बफर झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.

      यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरपतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकरपोलिस निरीक्षक तानाजी मोरेमुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय स्टाफ उपस्थित होते. जिथे भाजीपाला विकत होते ते भाजीपाला मार्केट आज बंद राहणार आहेतो भाग नगरपालिका मार्फत निर्जंतुक करणेत आला आहे. भाजी विक्रेते यांची रॅपिड टेस्ट होईल. त्यानंतर शुक्रवारपासून भाजी मार्केट सुरु करण्याचा निर्णय होईल. उर्वरित बाजारपेठ सुरु राहणार आहेअसे तहसिलदार यांनी जाहीर केले आहे.

      तर नागरीकांनी व व्यापा-यांनी घाबरुन जाऊ नये व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करतासामाजिक अंतर पाळून व्यवहार सुरु ठेवावेत व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष गिरप यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu