वेंगुर्ला-गाडीअड्डा येथील कंटेंन्मेंट झोनमध्ये असलेल्या घरांमध्ये पूजन करण्यात आलेल्या गणपतींचे विसर्जन आज नगरपरिषदेमार्फत सर्व नियम पाळून करण्यात आले.

      गाडीअड्डा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण मिळाल्याने तेथील रुग्ण वास्तव्यास असलेला भाग कंटेंन्मेंट झोन म्हणून जाहीर केला होता. या घरांमध्ये गणपतीचे पूजन करण्यात आले होते. कंटेंन्मेंट झोनमधील रहिवाशांना बाहेर फिरण्यास बंदी असल्याने त्यांच्या गणपतींचे विसर्जन आज दीड दिवसांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगर अभियंता अभिषेक नेमाणे, फिल्टर ऑपरेटर जयेंद्र चौधरी, सफाई कामगार बाबूराव जाधव, हेमंत चव्हाण, अनिल वेंगुर्लेकर, देवेंद्र जाधव, किरण जाधव, वाहन चालक अक्षय तेरेखोलकर, शशांक जाधव यांनी यावेळी गणपती विसर्जनासाठी सहकार्य केले.

This Post Has One Comment

Leave a Reply

Close Menu