वेंगुर्ला तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे एकूण ७० रुग्ण पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली आहे. मिळालेल्या रुग्णांमधून एकही रुग्ण दगावलेला नाही ही एक जमेची बाजू आहे.

      संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली असून याचे लोण आता वेंगुर्ला तालुक्यातही पसरले आहे. संपूर्ण तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ७० रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यातील ८ जण कोरोनामुक्त झाले असून ६२ जण सक्रिय आहेत. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्युचे प्रमाण शून्य आहे. २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळ पर्यंत नवीन रुग्णाची नोंद झाली नव्हती.

Leave a Reply

Close Menu