पक्षभेद विसरुन तालुकाध्यक्ष तथा नगरसेवकाने केले सहकार्य

नगरपरिषदेबरोबर विरुद्ध पक्षाचा नगरसेवकाने तथा तालुकाध्यक्षाने कंटेमेंन्ट झोनमधील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या तथा तालुकाध्यक्षाच्या गणपती विसर्जनासाठी सहकार्य करत आमच्यात पक्षभेद असले तरी मनभेद कधीच नाही हे आजच्या प्रकारातून विधाता सावंत यांनी  दाखवून दिले आहे. त्यांनी केलेल्या या सहकार्याची चर्चा शहारात दिसून येत आहे.

      वेंगुर्ला शहरातील राऊळवाडा येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तेथील काही परिसरात कंटेंमेंन्ट झोन जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कंटेंमेंन्ट झोनमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षातील नगरसेवक तथा भाजपाचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. शहरातील कंटेंमेंन्ट झोनमधील गणपतींच्या विसर्जनाची जबाबदारी नगरपरिषदेने घेतली आहे. त्यानुसार पाचव्या दिवशी नगरपरिषदेमार्फत श्री.गवंडळकर यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीसह अन्य गणपतींचेही विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी सदरची बाब वेंगुर्ला नगरपरिषदेतील नगरसेवक तथा राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाईलद्वारे गवंडळकर यांच्याशी संफ साधत तुमच्या गणपती विसर्जनाला आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार विधाता सावंत हे गवंडळकर यांच्या घरी येत गणपतीची उत्तरपूजा आणि आरती करीत गणपतीच्या विसर्जनाला सहकार्य केले. यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारीही उपस्थित होते.

      पक्षिय मतभेद बाजूला ठेऊन  एकुमेका सहाय्य करु‘ या उक्तीप्रमाणे नगरसेवक सावंत यांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Close Menu