ठाकरे सरकारच्या विरोधात घंटानाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली देवस्थाने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारने नियमावलींसह परिपत्रक जारी करुनही राज्य सरकारने महाराष्ट्रातील बरीच मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे आज वेंगुर्ला भाजपाच्यावतीने आणि भाविकजनताधार्मिक-अध्यात्मिक संस्थासंघटनादेवस्थानचे मानकरीविविध सांप्रदायाचे मान्यवर यांच्या सहकार्याने येथील ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोर आघाडी सरकारच्या विरोधात घंटानाद करण्यात आला.

      यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईनगराध्यक्ष दिलीप गिरपश्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे रविद्र परबविष्णू परबजगदीश परबबाळा परबनितेश परबस्वप्निल परबमंगेश परबप्रसाद परबमानकरी सुनिल परबशिवराम परबदेवस्थान पूजारी विजय गुरव यांच्यासह भाजपाचे समिर चिदरकरराहूल मोर्डेकरनिलय नाईकभगवान नाईकआनंद गावडेबाळकृष्ण मयेकरओंकार चव्हाणशरद मेस्त्रीविनोद लोणेशेखर काणेकरनिखिल घोटगेनगरसेवक नागेश गावडेधर्मराज कांबळीप्रशांत आपटे, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

      या घंटानाद दरम्यान, ‘दार उघड उद्धवादार उघड‘, ‘मदिरा चालूमंदिर बंद‘, ‘उद्धवा तुझा कारभारच धुंद‘, ‘दारु नकोदार उघड‘, ‘भक्तांना जेल गुन्हेगारांना बेलउद्धव सरकार झाले फेल‘, अशा स्वरुपाच्या घोषणा देण्यात आल्या.

तहसिलदार यांना निवेदन

      ग्रामदेवतेच्या बंद मंदिराबाहेर घंटानाद झाल्यानंतर वेंगुर्ला तहसिलदार यांना निवदेन देण्यात आले. तहसिलदार कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या प्रतिनिधी यांनी निवेदन स्विकारले. महाराष्ट्र वगळता देशभरात सर्व मंदिरे दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. परंतु हिदुत्वद्वेषी आघाडी सरकार जाणिवपूर्वक जनतेच्या मंदिर उघडण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. या तिघाडी सरकारकडून संधी मिळेल तेव्हा हिदुत्व विषयाची गळचेपी करण्याचे कारनामे सुरु आहेत. राज्यातील जनतेची श्रद्धास्थाने असलेली सर्व मंदिर कोविड नियमावलीच्या अटी शर्थीसह त्वरित खुली करण्यासाठीची आमची असलेली मागणी राज्य सरकारपर्यंत पोहचवावी असे या निवेदनात नमूद केले आहे.

तालुक्यातील अन्य ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोरही आंदोलन

      वेंगुर्ला शहराबरोबरच तुळसम्हापणवायंगणीरेडी येथीलही ग्रामदेवतेच्या मंदिरांसमोर ठाकरे सरकारच्या विरोधात घंटनाद करण्यात आला. यावेळी त्या त्या मंदिरांचे मानकरीपूजारीभाविक यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

Close Menu