►वेंगुर्ला तालुक्यात ३३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून वेंगुर्लावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शनिवारी (२९ ऑगस्ट) रात्री आणि रविवारी सकाळी पर्यंत आलेल्या अहवालानुसार एकूण ३३ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे.

      यात शिरोडा येथे ५, मोचेमाड येथे १२, न्हैचीआड येथे ६, वेंगुर्ला शहर राऊळवाडा येथे ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून हे आधीच्या पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तसेच आज आरवली सोन्सुरे येथे १ स्थानिक व्यक्ती व शिरोडा-केरवाडा येथे गोव्यावरुन आलेला व विलगिकरणात असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. मोचेमाड-देऊळवाडी येथील २०० मिटरचा परिसर कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, वेंगुर्ला तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

Leave a Reply

Close Menu