शरीरसौष्ठवपटू किशोर सोन्सूकर यांची गणरायाला अनोखी मानवंदना

वेंगुर्ला-वजराट येथील रहिवाशी, पाटकर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव किशोर सोन्सूरकर यांनी हे गजानन.. दैवत आमुचे विनायका तूया गाण्याच्या संगीतासह व्हिडिओच्या माध्यमातून गणपतीच्या मूर्तीसमोर नियमित व्यायाम करुन रोगप्रतिकारक शक्ती वाढवा असा संदेश जनतेला दिला आहे.

       देवाची पूजा करीत असताना सकाळी अथवा सायंकाळी किमान वीस मिनिटे व्यायाम करा. दिवसाची सुरुवात व्यायामाने झाली तर आहारावर नियंत्रण राहणार, भूक व्यवस्थित लागणार पर्यायाने शरीर तंदुरुस्त राहणार. दररोज किमान १० सूर्यनमस्कार, १० जोर, २० बैठका अशाप्रकारे व्यायामाला प्राधान्य दिल्यास निश्चितच आजार दूर पळतील असा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Reply

Close Menu