वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-पेडणेकरवाडी येथे शेतात जखमी अवस्थेत सापडलेल्या मोरावर प्राथमिक उपचार करून तेथील नागरिकांनी तो वनविभागाच्या स्वाधीन केला.
      दाभोली-पेडणेकरवाडी येथील अण्णा जोशी हे दुपारी शेतात आपली गाय बघण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना फडफडणाऱ्या पक्षाचा आवाज ऐकू आला, त्यांनी त्या दिशेला पाहिले असता त्यांना एक मोर जखमी अवस्थेत दिसून आला. त्यांनी तात्काळ शेजारी असलेल्या  संजय पेडणेकर यांना मदतीला घेऊन त्या जखमी मोराला पकडले. त्याच्या पायाला जखम झाल्यामुळे तो नीट उडू शकत नव्हता. दरम्यान त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांनी हा मोर मठ चे वनरक्षक विष्णू नरळे व शंकर पडावे यांच्या स्वाधीन केले.

Leave a Reply

Close Menu