नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे – एम.के.गावडे

नारळ हा कल्पवृक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे. त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.

      वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के.जी.गावडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्निल परब, नितेश मयेकर, नंदगडकर, प्रदिप सावंत आदी उपस्थित हाते.

      संस्थेतर्फे दरवर्षी  २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो. कोकणच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्ठीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतक-यांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.

      नारळ हा कल्पवृक्ष आहे. एक नारळाचे झाड एका माणसाला संपुर्ण वर्षभर पोसू शकते. नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही. झावळ, सोडणे, खोड, करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत. तरीही आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा, काजू, लागवडी प्रमाणेच येथे नारळ लागवड मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन के.जी.गावडे यांनी करुन संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमिताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी यासाठी करीत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुस्कास्पद असल्याचे सांगितले.

      यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर, स्वप्निल परब यांचा शाल, श्रीफळ व नारळाचे झाड देवून सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न प्रणव मुखर्जी, तसेच संस्थेचे सचिव एम के.गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रज्ञा परब यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu