कोव्हीड १९च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती. अशा गरजूंना धान्य देण्यासाठी ‘‘एक हात मदतीचा‘‘ या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्यावतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य जमा करण्याचे आवाहन श्री गिरेश्वर सोसायटीतर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील ३५० कार्डधारकांनी प्रधानमंत्री मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत मिळालेल्या धान्यातील १ किलो प्रमाणे धान्य गोळा केले. गोळा केलेल्या धान्यापैकी १०० किलो धान्य संविता आश्रम पणदूर१०० किलो धान्य जिव्हाळा सेवाश्रम पिंगुळी१५० किलो धान्य गावातील गरजू व गरीब व्यक्तींना प्रत्येकी १० किलो प्रमाणे देण्यात आले. तसेच वजराट- देवसूवाडीतर्फे अणाव येथील आनंदाश्रम यांना १०० किलो धान्य देण्यात आले.

      यावेळी श्री देव गिरेश्वर सोसायटीचे चेअरमन बाबुराव परबउपाध्यक्ष वसंत पेडणेकरसंचालक विलास गावडेसचिव पांडुरंग दळवीग्रामसेवक गावडेरविद्र पेडणेकरसाईप्रसाद केरकरबाळकृष्ण सोनसुरकरप्रवीण गावडेरजत पडते आदी उपस्थित होते. यावेळी रविद्र पेडणेकर आणि आनंद करंगुटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यापूर्वी या गावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५१,०१९ रुपयांची मदत केली आहे.

Leave a Reply

Close Menu