वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मालमत्तांना विशेष नामाभिमान नसल्याने ब-याचवेळा एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन करताना त्या विशिष्ट इमारतीला किवा सभागृहाला संबोधणे प्रशासनाला अडचणीचे ठरत होते. त्यामुळे ६ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत या मालमत्तांना विशिष्ट नामकरण करण्याचा ठराव घेण्यात आला. दरम्यानक्रॉफर्ड मार्केटमानसीश्वर उद्यान आणि घोडेबांव उद्यान यांची नावे न बदलता आहे तिच ठेवण्यात आली आहेत. 

      ठरावानुसार इमारतींना दिलेली नुतन नावे पुढीलप्रमाणे- भाळी मार्केट इमारतीला मुख्य प्रशासकीय इमारत‘, याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील मोठ्या सभागृहास स्वामी विवेकांनद सभागृहतर दुस-या मजल्यावरील छटेखानी सभागृहाला डॉ.कोटणीस कॉन्फरन्स हॉल‘, शिवाजी सभागृहाला श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह‘, जुन्या कार्यालयाला स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन‘, वाणिज्य संकुल-सांस्कृतिक भवन आणि आय.डी.एस.एम.टी. इमारतीला लोकमान्य टिळक वाणिज्य संकुल‘, भाजी मार्केटला पवनपुत्र भाजी मंडई‘, मच्छिमार्केटला सागररत्न मच्छिमार्केट‘, मल्टिपर्पज हॉलला मधुसुदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृह‘, बहुउद्देशिय सभागृहातीला रंगमंचाला चि.त्र्यं.खानोलकर उर्फ आरती प्रभू रंगमंच‘, सी.पी.जी.गार्डनला कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यान‘,  त्रिकोणी गार्डनला त्रिवेणी उद्यान‘, जलशुद्धीकरण केंद्राला जीवनधारा जलशुद्धीकरण केंद्र‘, अग्निशमन केंद्राला दक्षमा अग्निशमन केंद्र‘, कंपोस्ट डेपोला स्वच्छ भारत पर्यटन स्थळ‘, बंदर येथील रिसॉर्टला जलपरी रिसॉर्ट‘, कॅम्प येथील रिसॉर्टला निसर्ग रिसॉर्ट‘, आनंदवाडी समाजमंदीरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर‘ अशाप्रकारे नामकरण करण्यात आले आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या पाण्याच्या टाक्यांनाही नावे देण्यात आली असून यामध्ये कावेरी जलकुंभ (गाडीअड्डा)कृष्णा जलकुंभ (निमुसगा)पंचगंगा जलकुंभ (अग्निशमन), नर्मदा जलकुंभ (गोळीबार मैदान)गोदावरी जलकुंभ (जलशुद्धीकरण केंद्र)वसिष्ठी जलकुंभ (धनगरवाडी वडखोल)कोयना जलकुंभ (बी.पी.टी.टाकी) आदींचा समावेश असून वेशी भटवाडी येथे प्रस्तावित टाकीला चंद्रभागा जलकुंभ असे नाव देण्यात येणार आहे.

      कर्मचारी वसाहतींपैकी जुन्या वसाहत पारिजात‘, नविन वसाहत सोनचाफा‘, पाणीपुरवठा वसाहत गुलमोहर‘, अग्निशमन वसाहत सदाफुली‘ याप्रमाणे तर खेळाच्या मैदानांपैकी व्यायामशाळेला पै.खाशाबा जाधव व्यायामशाळा‘, शुटींग रेंजला एकलव्य नेमबाजी प्रशिक्षण केंद्र‘, स्विमिग पूलला सिधुसागर जलतरण तलाव‘, बॅडमिटन हॉल-पॅव्हेलियनला सिधु बॅडमिटन पॅव्हेलियन‘, क्रिडांगणाला मेजर ध्यानचंद क्रिडांगण‘ अशी नुतन नावे देण्यात आली आहेत.

      शहरातील स्मशानभूमींचेही नामकरण करण्यात आले असून तांबळेश्वरधावडेश्वर आणि आनंदवाडी स्मशानभूमीला आहे तेच नाव ठेवले आहे. फक्त दाडाचे टेंबला मुक्तीधाम‘ स्मशानभूमीला नाव देण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu