शहरातील ६५ शिक्षकांचा ‘कोव्हीड योद्धा‘ म्हणून सन्मान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला नगरपरिषदेने शहरातील अधिग्रहीत केलेल्या शाळांमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्या शिक्षकांनी उत्कृष्टपणे सेवा बजाविल्या आहेत.त्यांनी केलेल्या उच्चत्तम कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नगरपरिषदेच्यावतीने कोव्हीड योद्धाम्हणून वेंगुर्ला शहरातील ६५ शिक्षकांना शाल, श्रीफळ व मानपत्र देवून गौरविण्यात आले.

         नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात ११ सप्टेंबर रजी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल आदी उपस्थित होते. संतोष परब व शंकर वजराटकर या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर शिक्षकांचा कोव्हीड योद्धाम्हणून सन्मान करणारी वेंगुर्ला नगरपरिषद ही पहिली नगरपरिषद असल्याचे मनोगत व्यक्त करुन सर्व शिक्षकांच्यावतीने किशोर सोनसुरकर यांनी आभार मानले. 

      केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सुचनांना अनूसरुन शासनाकडून माध्यमिक शाळा व महाविद्यालये सुरु करणे नियोजित आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांच्या आरोग्याचे हित जोपासण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टीने वेंगुर्ला शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांना डिजिटल सॅनिटाईज मशीन व मास्क उपलब्ध करुन देणार असल्याचे नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत आपटे यांनी तर आभार उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu