वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १७ सप्टेंबर रोजी माझे कुटुंब-माझी जबाबदारीया मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. शहरात आठ पथकांची प्रभागनिहाय नेमणूक करण्यात आलेली आहे. सदरचे पथक प्रभागातील प्रत्येक घरांमध्ये असणा-या नागरीकांच्या शरिरातील तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण (पल्स ऑक्सीमिटरद्वारे) आदी तपासणार अहेत. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारची तपासणी केली जाणार नाही.

      तरी नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रत्येक नागरीकाने घाबरुन न जाता आपल्या आरोग्य व हिताच्यादृष्टीने घरी येणा-या आरोग्य नगरपरिषद पथकाकडून तपासणी करुन सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप व मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu