वेंगुर्ला तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार सुरुवात केली. यामुळे ठिकठिकाणी काही पुलांवर पाणी आल्याने मार्ग ठप्प झाले होते. दरम्यान भात कापणीच्या तोंडावर पावसाने जोर धरल्याने भातशेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गेल्या २४ तासात १०९ मिमी पावसाची नोंद झाली तर दुपारपर्यंत कोणतीही पडझड झाली नसल्याची महिती तहसिल कार्यालयाकडून देण्यात आली.

      वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात पुलांवर पाणी आल्याने काही मार्गही ठप्प झाले आहेत. सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ला जाणा-या मुख्य रस्त्यावर होदवडा-तळवडे गावांना जोडणा-या मुख्य पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती. वाहतूक मातोंड मार्गे वेंगुर्ला अशी वळवण्यात आली. दरम्यानया पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ग्रामीण भागात नुकताच भात कापणीला प्रारंभ करण्यात आला होता. तसेच काही भागात भातही कापणीसाठी आले होते. मात्र या पावसामुळे शेतात पाणी साचून भात शेती जमीनीवर पडून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Close Menu