►वेंगुर्ला शहरात दुचाकी चोरीच्या घटना

      वेंगुर्ला शहरात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून कॅम्प परिसरात राहत्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये उभी असलेली दुचाकी २४ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चोरीस गेली आहे. या घटनेसंदर्भात संबंधित गाडी मालकांनी वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे रितसर लेखी तक्रार नोंदविली असून लवकरात लवकर चोरट्यांचा छडा लावावा अशी मागणी केली आहे.

      दरम्यानकाही दिवसांपूर्वी साकव पूलानजिकच्या श्री सिद्धिविनायक प्लाझा येथील रहिवाशाची दुचाकी चोरीस गेली असून त्याच दुचाकी मालकाच्या चारचाकी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्रया प्रयत्नात दरवाजाचा हॅण्डल तुटून गाडीचे नुकसान करण्यात आले. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या दुचाकींमधील पेट्रोल काढण्याचेही प्रकार समोर येत आहेत.

Leave a Reply

Close Menu