मंदिरे उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषणासह भजन आंदोलन

          कोरोना काळात बंद असलेली राज्यातील मंदिरे तातडीने उघडावीत यासाठी वेंगुर्ला तालुका भाजपच्यावतीने १३ ऑक्टोबर रोजी रामेश्वर मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण व भजन म्हणून अनोखे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, दिलीप गिरप, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, सुरेंद्र चव्हाण, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, सोमनाथ टोमके, दिपक नाईक, शैलेश जामदार, समिर चिदरकर, तात्या कोंडसकर, हर्षद साळगांवकर, सत्यवान परब, बाळू प्रभू, शेखर काणेकर, सुनिल घाग, गुरुप्रसाद खानोलकर, पुंडलिक हळदणकर, शरद मेस्त्री, सुनिल वारंग, महेश खानोलकर, संतोष मोर्ये, आर.टी.परब, अभी वेंगुर्लेकर, शेखर कोयंडे, रामेश्वर देवस्थानचे रवी परब, दाजी परब, सुनिल परब, विजय गुरव, पपू परब, निखिल घोटगे, वारकरी रवि धावडे, अमर फटनाईक, राकेश परब, तेजस परब, दादा नवार, शाम नाडकर्णी, नाना राऊळ आदी सहभागी झाले होते.

This Post Has One Comment

  1. कोरोनाचे वादळ घोंघावत असताना आणि हिंवाळ्यात त्याचे प्रमाण वाढण्याचे संकेत मिळत असतांना अशा प्रकारचे आंदोलन व मागणी करणे कितपत योग्य आहे ? हे कुणाच्या हितासाठी चालले आहे ? जनतेच्या की राजकीय पुढार्यांच्या ? असा प्रश्न प्रत्येकाने या आंदोलनकर्त्यांना विचारायला हवा. हा स्टंट केवळ आणि केवळ विद्यमान महाराष्ट्र सरकार बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी सत्तालोलुप असलेल्या एका राजकीय टोळीने रचलेला डाव आहे. याला आमदनतेने बळी पडू नये उलट यांना याचा जाब विचारावा. ” आमच्या जीवाची तुम्हाला तमा नाही काय ? आणि या कोरोना संकटापासून आम्हांला वांचविण्यासाठी तुम्ही काय केलेत ? ” हा प्रश्न ठामपणे त्यांना विचारायला हवा.

Leave a Reply

Close Menu