►वेंगुर्ल्यात कोरोनाच्या सावटाखाली नवरात्रौत्सवाला प्रारंभ

वेंगुर्ला शहरात आजपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला असून ४ ठिकाणी नवदुर्गेचे पूजन तसेच ग्रामदेवी श्री सातेरी मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.

    आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. वेंगुर्ला शहरात मातोश्री कला क्रिडा मंडळ दाभोली नाकातांबळेश्वर-भगवती मित्रमंडळ गाडीअड्डाकॅम्प कॉर्नर मित्रमंडळ आणि शिवसेना संफ कार्यालय सुंदरभाटले येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही नवदूर्गेचे पूजन करण्यात आले. सध्या कोरोनाचे सावट असल्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदा साधेपणाने नवरात्रौत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच आरोग्य विषयक उपक्रम राबविले जाणार आहेत.

      येथील ग्रामदेवी श्री सातेरी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व देवीचे दर्शन बंद असल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून छायाचित्रांच्या स्वरुपात नऊ दिवस देवीचे दर्शन भाविकांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आज पहिल्या दिवशी श्री सातेरीची बैठी पूजा बांधण्यात आली.

Leave a Reply

Close Menu