सिधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात ५० जणांचे रक्तदान

सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिधुदुर्ग शाखा वेंगुर्लाच्यावतीने वेंगुर्ला – कुबलवाडा येथील ओंकार मंगल कार्यालय येथे दि.१८ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध डॉ.वामन कशाळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर डॉ. अंजली जोशी, सिधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या तथा नगरसेविका श्रेया मयेकर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात रक्तदानाची आवश्यकता याबाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. उद्घाटक डॉ.वामन कशाळीकर यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

      या शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले. आलेल्या दात्यांचे रक्त संकलित करण्याचे काम एस.एस.पी.एम.हॉस्पिटल पडवे येथील रक्तपेढी प्रमुख डॉ.जनार्दन बावणे, टेक्निशियन मनिष यादव, पूजा गुरव, सुमित मुकादम, स्टाफ नर्स प्रणया वळंजू, स्वप्नाली मेस्त्री, सहाय्यक संतोष जाधव, विराज दळवी यांनी केले. तर शिबिर यशस्वी होण्यासाठी शिबिराचे मुख्य आयोजक निखिल सिद्धये, उपाध्यक्ष महेश राऊळ, सचिव किशोर नाचणोलकरसदस्य नित्यानंद आठलेकर, पेट्रीक डिसोजा, मयुरेश पेडणेकर, नितीन कुळकर्णी, सनी रेडकर, यशवंत किनळेकर, भगवान मसुरकर, सल्लागार उद्धव गोरे यांच्यासह शरद पुराणिक, अण्णा जोशी, शशांक मराठे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी संत-सिद्धये यांनी केले.

Leave a Reply

Close Menu