वेंगुर्ला-भटवाडी येथील मे.कृपा फ्युअल सेंटर या HPCL पेट्रोल पंपावर MNGL तर्फे पर्यावरण पूरक आणि किफायतशीर अशा CNG स्टेशनचे उद्घाटन २० ऑक्टोबर रोजी करण्यात आले. यावेळी MNGL कंपनीचे सिधुदुर्ग प्रमुख किरण ठुसे, वितरण अधिकारी उमेश जाधव, विक्री अधिकारी स्पप्नील गुंडे, HPCL वास्को रिजनल हेड जी.मंजूनाथ, विक्री अधिकारी आदित्य पगारिया, पेट्रोल पंपाचे मालक शरद वरसकर, विजय वरसकर, पुष्पा नांदगांवकर यांच्यासह पेट्रोल पंप कर्मचारी आणि वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या CNG स्टेशनमुळे वेंगुर्ला तालुक्यातील वाहन चालकांना पर्यावरणपुरक स्वच्छ व किफायतशीर इंधन उपलब्ध होणार असल्याने वाहनचालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu