गेले कांही दिवस तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या घटनाही घडत आहे. बुधवारी (दि.२१) विजांच्या व ढगांच्या गडगडाटांसह कोसळलेल्या पावसामुळे येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची विहिर गुरुवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही विहिर २५ फूट व्यास रुंदीची व २५ फूट खोलीची होती. या विहिरीचे पाणी प्रादेशिक फळ संशोधन केंद्राच्या परीसरातील झाडांना व नर्सरीतील रोपांना पाणी देण्यासाठी वापरले जात असे. ही विहिर ५० फुटाच्या व्यासाच्या अंतराने कोसळली असून या विहिरी शेजारी ठेवण्यांत आलेली सुमारे ४ ते ५ हजार जांभूळ रोपे हि विहिरीत गाढली जाऊन त्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे विहिरीसह सुमारे ७०  लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीची नोंद वेंगुर्ला तहसिलदार कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात झाली आहे.

Leave a Reply

Close Menu