शितशवपेटीचा लोकार्पण सोहळा संपन्न

वेंगुर्ला शहरांतील नागरिकांचे नातेवाईक नोकरी वा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी म्हणजे मुंबईपुणे यासह ५०० किमीच्या बाहेर असतात. काहीवेळा अशा कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांचे नातेवाईक लांबच्या ठिकाणाहून अंत्यदर्शनासाठी येण्यास फार वेळ म्हणजे १० ते १५ तास लागतात. अशावेळी मृतदेह हा खराब होऊ नये. तो स्वतःच्या घरातच ठेवता यावा. यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेने १ लाखाच्या स्वनिधीतून शितशवपेटी खरेदी केली आहे. सदरची शितशवपेटी वेंगुर्ल्यात दाखल होताच या शितशवपेटीचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाला. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळमुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगेनगरसेवक प्रशांत आपटेसुहास गवंडळकरप्रकाश डिचोलकरविधाता सावंतआमाराम सोकटेधर्मराज कांबळीश्रेया मयेकरकृतिका कुबलस्नेहल खोबरेकरनगरपरिषद आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकरव कर्मचारी आदी उपस्थित होते.

      सदरची शितशवपेटी ही वेंगुर्ला नगरपरीषद कार्यालयाच्या ठिकाणी ठेवण्यात येणार असून नाममात्र ५०० रुपये फि वापर करणा-या नागरीकांस भरावी लागणार आहे. या पैशातून त्या शितशवपेटीची देखभाल व मागणी करणा-या नागरीकाच्या घरापर्यंत ती पोहचविणे व तेथून मुळ जागी आणून ठेवणेचे काम नगरपरीषदेचे कर्मचारी करणार आहेत. या शितशवपेटीच्या सुविधेचा लाभ घेणा-या नागरीकांनी वेंगुर्ला नगरपरीषद कार्यालयात संफ नंबर ०२३६६-२६२०२७ किवा टोल फ्रि नंबर १८००२३३२०९९ या क्रमांकावर संफ साधावाअसे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu