मीराताई जाधव – एक बहुआयामी व्यक्तिमत्व

    मीराताई. वयाच्या ९३व्या वर्षापर्यंत त्यांनी हे ताईपण जपले होते. साप्ताहिक किरातचा संपादक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आवर्जून मला फोन करुन आपलेपणाचे कौतुक तर केलेच, शिवाय पत्रकारितेतील मूलमंत्रही दिले.किरातमधून कोणाचे अभिनंदन किवा विशेष दखल घेतलेली दिसली की, मीराताईंचा हमखास फोन. कौतुक, आशीर्वादाबरोबरच प्रोत्साहन देणा-या मीराताईंचे हे विशेष वेगळेपण! त्या स्वतःच सांगायच्याही समाजातील लोक एखादी चांगली गोष्ट झाली की, त्याची दखल घेऊन दाद देतीलच असे नाही. पण अनाहूत चूक होऊ दे, तुटून पडतील. त्यामुळे आपल्या पत्रकारितेत आणि समाजात वावरताना सजग तर राहिलेच पाहिजे. पण स्पष्टवक्तेपणाने बोललेही पाहिले. नाहीतर समाज आपल्या गुळमुळीतपणाचा कधी आणि कसा वापर करुन घेईल याचा थांग लागणार नाही. त्यांच्याशी गप्पा मारताना अनुभवातून आलेले त्यांचे हे बोलणे म्हणजे जणू जीवनाचा त्या वस्तूपाठच सांगायच्या. सिधुभूमीतील तीहा सिधुदुर्गातील पत्रकार महिलाया विषयावर लेख लिहिला तेव्हा पत्रकार क्षेत्रातील महिलांचे वाढत प्रमाण कौतुकास्पद असल्याचे सांगत त्यांनी पत्रकार म्हणून आपण कार्यरत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला हता.

        सावंतवाडी येथील पितृतुल्य असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि मुद्रण व्यावसायीक बाप्पा धारणकर यांच्या मीराताई या कन्या. त्यांचा पत्रकारितेतील वारसा त्यांनी मनापासून जोपासला. मॅट्रीक नंतर २०व्या वर्षीच राणी पार्वती देवी विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांची कारकिर्द सुरु झाली. नोकरी करीत असतानाच स्वतः पदवीधरही होत हिदी शिक्षक म्हणून सनद मिळविली. कै.बाप्पांनी सुरु केलेल्या वि.स.खांडेकर विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. सहकारी शिक्षक माधवराव जाधव यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे सामाजिक सेवेचे व्रत सुरुच होते. त्याला माधवरावांनी चांगले सहकार्य दिले. परंतु, २० वर्षाचे त्यांचे सुखी सहजीवन माधवरावांच्या हृदयविकाराने झालेल्या आकस्मिक मृत्यूने संपले. पण खचून न जाता दोन लहान मुलांची जबाबदारी घेऊन मीराताईंनी खंबीरपणे वाटचाल सुरु ठेवली. सावंतवाडी नगरपरिषदेत १७ वर्षे त्या नगरसेवक होत्या. समाजकल्याण बोर्डाच्या सदस्य म्हणूनही त्यांची निवड झाली होती. होमगार्डच्या लेडिज प्लॅटून कमांडर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते. याखेरीज विविध शासकीय समित्यांवर त्यांची निवड झाली होती. हे करीत असताना महिला मंडळे स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. महिलांसाठी प्रबोधन, व्यवसाय मार्गदर्शन असे उपक्रम राबविले. मीराताई राजकारणात सक्रीय असल्या तरी पक्षीय अभिनिवेश त्यांच्याकडे नव्हता. विधायक राजकारणासाठी त्या कायमच आग्रही असत. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. माणूस कितीही मोठा झाला तरी केलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप त्याला प्रेरणा देत असते हे बीज ओळखून अशा निवडक व्यक्तींबद्दल कायमच त्यांनी व्याध‘, ‘सत्यप्रकाश‘, ‘किरात‘, ‘दै.तरुण भारतमधून प्रसिद्धी दिली. ब-याच कार्यक्रमांमधून त्या आवर्जून उपस्थित रहात आणि पूर्वीपेक्षा सर्व सुखसोयी हातात असताना निर्भिडपणे समस्यांना सामोरे जाण्याचे कौशल्य अंगी बाणवावे यासाठी त्या आग्रही रहात. आपल्या जमान्यातील पत्रकारिता आणि आजच्या जमान्यातील पत्रकारितेमध्ये आमुलाग्र बदल झालेला असला, तरी त्या सर्वांशी जुळवून घेत असत. निर्भिडपणा, निभर्यपणा, निःपक्षपातीपणा, दुर्दम्य आशावाद, जिद्द, चिकाटी अशा सर्व गुणांचा समुच्चय मीराताईंपाशी होता.

       सिधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या महिला संपादक आणि पत्रकार असा दुहेरी बहुमान मीराताईंच्या कर्तृत्वाने त्यांना लाभला. अनेक पुरस्कार त्यांच्या या गुणांनीच त्यांना मिळाले. जुना संदर्भ, कुठल्याही विषयावर मार्गदर्शन असो, हक्काने साधता येणारा संवाद आता थांबला आहे. सिधुदुर्गात त्यांच्यापासून सुरु झालेला पत्रकारितेचा पायंडा आम्हा पत्रकारांना कायम स्फूर्तीदायक ठरणार आहे. किरातपरिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!

 

Leave a Reply

Close Menu