पोलिस पाटीलांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

वेंगुर्ला तालुक्यातील १८ पोलिस पाटीलांना कोरोना योद्धा म्हणून भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन मेस्त्री, निकिता पोखरे (आजगांव), निलेश पोळजी (आसोली), ऋतिका नाईक (पाल), बापू गावडे (अणसूर), आश्विनी खवणेकर (मोचेमाड), विजय नार्वेकर (उभादांडा), प्रकाश तुळसकर (तुळस), संजना होडावडेकर (आडेली), जनार्दन पेडणेकर (दाभोली), धोंडू खानोलकर (खानोली) या पोलिस पाटीलांसह जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्ष स्मिता दामले, साईप्रसाद नाईक, सुरेंद्र चव्हाण, सोमनाथ टोमके, बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, धर्मराज कांबळी, संदिप पाटील, प्रणव वायंगणकर, दादा केळुसकर, बाबा नाईक, शेखर काणेकर, दादा तांडेल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu