९ महिलांना ‘नवदुर्गा‘ पुरस्कार

‘जागर नवरात्रीचा-सन्मान नारी शक्तीचा‘ या कार्यक्रमांतर्गत वेंगुर्ला भापजाच्या महिला मोर्चाच्या निमित्ताने तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणा-या व विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगिरी करुन आपल्या नावाची छाप निर्माण करणा-या ९ रणरागीणींचा  भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे यांच्या हस्ते ‘नवदुर्गा पुरस्कार‘ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर-सामंत, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, पोलिस उपनिरिक्षक रुपाली गोरड, सरस्वती संगीत विद्यालयाच्या संचालिका अनघा गोगटे, नर्मदा कॅश्यू इंडस्ट्रीजच्या मंदाकिनी सामंत, क्रीडा मार्गदर्शक व अॅथलेटिक्स संजिवनी चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक व कवी वदा कांबळी, कोरोनाच्या लढ्यात इन्सीडंट कमांडर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, कोरोना सर्व्हेक्षण ट्रेस ट्रॅकिग व ट्रीटमेंट असे अत्यंत जोखमीचे काम करणा-या ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेविका विनीता तांडेल आदींचा समावेश आहे. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu