किरातच्या खुल्या लेखन स्पर्धेत डॉ. हर्षदा देवधर प्रथम

      पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथील किरात दिवाळी अंकासाठी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना प्रोत्साहन म्हणून आयोजित केलेल्या खुल्या कथा लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये डॉ.हर्षदा देवधर (झाराप) यांनी प्रथमसरिता पवार (कणकवली) यांनी द्वितीय तर प्राजक्ता आपटे (वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

      सदर स्पर्धेत सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उर्वरित निकालामध्ये चतुर्थ-श्वेतल परब (सावंतवाडी)पाचवा-मुग्धा शेवाळकर (दोडामार्ग) आणि सहावा-कल्पना मलये (कणकवली) यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे परिक्षण ज्येष्ठ साहित्यिक वीरधवल परब (वेंगुर्ला) यांनी केले. या स्पर्धेतील १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरातच्या दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रक्कमेसहीत अरुण सावळेकर लिखित नाट्यरंग‘ या दीर्घांकिकेची प्रत दिवाळी अंकासोबतच भेट म्हणून दिली जाणार आहे. 

      सर्व विजेत्या व सहभागी झालेल्या स्पर्धकांचे आयोजक अरुण सावळेकर (पुणे) व किरात परिवारातर्फे अभिनंदनासह आभार व्यक्त केले आहेत.

This Post Has 2 Comments

  1. A very commendable activity conducted by the senior Literary Shri Arun Sawalekar.
    Hearty congratulations to all the winners of this contest.
    A special thanks to Kirat for highliting the good work as usual.

    Shealtiel Kaley

  2. प्रोत्साहन स्पर्धा एक्दम झकास
    👍👍👍👍🌹🌹🌹

Leave a Reply

Close Menu