वेंगुर्ला-देऊळवाडा सातेरी मंदिर येथील सुपुत्र राजेश सुरेश परब हे गोवा विद्यापीठातून फार्मसी विषयांत पी.एच.डी.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ते गोवा राज्यातून फार्मसी विषयात अशी पदवी प्रथम क्रमांकाने मिळविणारे एकमेव विद्यार्थी ठरले आहेत. त्यांना गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.गोपाळ कृष्णा राव यांचे मार्गदर्शन लाभले.

      त्यांना मानपत्र व पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या अपूर्व यशाबद्दल वेंगुर्ला तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुकासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Close Menu