दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला येथील विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे वेंगुर्ला तालुका मर्यादित दोन गटात ऑनलाईन नरकासूर‘ स्पर्धा आयोजित केली आहे. नरकासूराची प्रतिकृती ही कलात्मक आणि पर्यावरण पूरक असावी. नावनोंदणी शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत हर्षद लोणे (७७१९००३९५०७२१९३९३८१४) किवा प्रशांत सागवेकर (९८२३१३८३५९९४०४७७९२४४) यांच्याकडे करावी.

      मोठ्या गटासाठी ७ फुटावर मर्यादा असून यातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १० कोंबडी व १००० रु.७ कोंबडी व ७००५ कोंबडी व ५०० रुपये तर लहान गटासाठी ७ फुटाखाली मर्यादा असून यातील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ७ कोंबडी व १००० रु.५ कोंबडी व ५००४ कोंबडी व ४०० रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी मोठ्या गटासाठी २०० तर लहान गटासाठी १०० एवढी प्रवेश फी गुगल पे ऑनलाईन क्युआर कोड स्कॅन करुन भरावयाची आहे.

Leave a Reply

Close Menu