ऑनलाईन नरकासूर स्पर्धेत जबरदस्त राऊळवाडा आणि हॉस्पिटलनाका मित्रमंडळ प्रथम

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेंगुर्ला येथील विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे १३ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुका मर्यादित ऑनलाईन नरकासूरस्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मोठ्या गटात १० आणि लहान गटात १४ मंडळांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या स्पर्धक मंडळांनी आपापल्या नरकासूराचे फोटो आयोजकांकडे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठविले हते. त्यानुसार आयोजकांनी संबंधित मंडळाच्या नरकासूराला भेट देत कोरोनाचे नियम पाळून परिक्षण केले.

      संक्षिप्त निकाल पुढीलप्रमाणे – लहान गट-प्रथम-जबरदस्त मित्रमंडळ राऊळवाडा, द्वितीय-गाडीअड्डा मित्रमंडळ, तृतीय -बेधडक मित्रमंडळ गिरपवाडा, मोठा गट – प्रथम – हॉस्पिटल नाका मित्रमंडळ वेंगुर्ला, द्वितीय- हौशी तरुणाई आडेली-खुटवळ, तृतीय-वेंगुर्ला-गावडेवाडी रॉक्स. स्पर्धेचे परिक्षण जे.जे. आर्टस् स्टुडंट दिगंबर कासकर, मूर्तीकार सतेज मयेकर, गणपत गावडे, पेंटर महाबळेश्वर रेडकर यांनी परिक्षण केले. परिक्षणासाठी हर्षद लोणे, प्रशांत सागवेकर, अर्जुन सागवेकर, सिद्धेश कांदळगांवकर यांनी सहकार्य केले. विजेत्यांना रविवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजता विठ्ठलवाडी, बंदर रोड येथे गौरविण्यात येणार आहे. तरी यावेळी संबंधित विजेत्यांनी उपस्थित राहून आपापली बक्षिसे स्विकारावीत असे आवाहन विठ्ठलवाडी सहपरिवारातर्फे केले आहे.

      दरवर्षी वेंगुर्ला शहरामध्ये एकाच ठिकाणी स्पर्धा घेण्यात येते. मात्र, यावर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने सर्व नरकासूरांची एकत्रितरित्या स्पर्धा ठेवण्यात आली नव्हती. त्यामुळे ब-यास नागरीकांना यावर्षी मंडळांचे नरकासूर प्रत्यक्षरित्या पहाता आले नाही.

Leave a Reply

Close Menu