सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना भटक्या विमुक्त जातीतील कातकरी समाजातील लोकांना फराळ व मिठाई तसेच महिलांना साडी भेट देवून अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी करत वेंगुर्ला भाजपाने समाजापुढे एक वेगळा आदर्श घातला आहे. हा कार्यक्रम नुकताच कॅम्प येथील त्यांच्या वस्तीवर पार पडला.

       कातकरी वस्तीतील लोकांना आपल्या घरुन आणलेला फराळ व मिठाई देण्याचा उपक्रम वेंगुर्ला भाजपातर्फे गेली पाच वर्षे सातत्याने राबविला जात आहे. यावर्षी १८ महिलांना भाऊबिज म्हणून साड्या भेट देण्यात आल्या.  यावेळी अर्जुन पवारराजू पवारनितीन पवारबाबी पवारराज पवारध्रुपदा पवारअंकुश निकमअजय निकमसुरेश पवारचंदू पवारशिवाजी पवारकाशिराम पवारमोहन पवारविक्रम निकमजयराम पवारउमेश निकमविश्वास निकमप्रकाश पवार यांच्यासह भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाईनगराध्यक्ष दिलीप गिरपतालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरजिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमकेमहिला तालुकाध्यक्ष स्मिता दामलेनगरसेवक प्रशांत आपटेपूनम जाधवसाक्षी पेडणेकरसरपंच पपू परब तसेच बाबली वायंगणकरप्रणव वायंगणकररफिक शेखकिर्तीमंगल भगतवृंदा गवंडळकरराधा सावंतपुंडलिक हळदणकरशरद मेस्त्रीमहेंद्र घाडी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu