होडावडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

जनसुविधा योजना व १४ वा वित्त आयोगा अंतर्गत उभारण्यात आलेल्या होडावडा ग्रामपंचयातीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते फित कापून व फलकाचे अनावरण करुन करण्यात आले. यावेळी सभापती अनुश्री कांबळी, गटविकास अधिकारी उमा पाटील, पं.स.सदस्य यशवंत परब, सुनील मोरजकर, सरपंच अदिती नाईक, सचिन वालावलकर, निलेश चमणकर, मातोंड सरपंच जानवी परब, होडावडा उपसरपंच रसिका केळुसकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा परब, उत्तम धुरी, संदेश सावंत उपस्थित होते.

      ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिगंबर दळवी, रमाकांत नाईक तसेच विनामूल्य जमीन देणारे जमीन मालक रामचंद्र नाईक, प्रसाद नाईक, सर्व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

      नागरिकांनी कोव्हीड संपला असा गृहीत धरु नका. शासनाच्या नियमांचे पालन करा. मुलांच्या सुरक्षिततेसाठी मास्क, सॅनिटायझर शाळेत असणे आवश्यक आहे. यासाठी आमदार फंडातून तालुक्याला निधीही देण्यात येईल. पुढील काळात वेंगुर्ला तालुक्याला सुसज्ज अशी अॅम्ब्युलन्सही देण्यात येईल असे आमदार केसरकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले.

Leave a Reply

Close Menu