२०० महिला व मुलींची मोफत नेत्र तपासणी

वेंगुर्ला न.प.च्या महिला बालकल्याण स्वास्थ समिती व डॉ.गद्रे नेत्र रुग्णालय कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने १८ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या महिला व मुलींसाठी कॉम्प्युटरद्वारे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीराचा सुमारे २०० जणांनी लाभ घेतला. न.प.कार्यालय नवीन इमारत येथे आयोजित केलेल्या या शिबीराचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी अस्मिता राऊळ, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, विधाता सावंत, शितल आंगचेकर, कृपा गिरप-मोंडकर, श्रेया मयेकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकिय अधिकारी संगिता कुबल, महिला बालकल्याण विभागाच्या लिपिक निशा आळवे, डॉ.गद्रे रुग्णालय कुडाळचे डॉ.अमद पाटील, उदय दाभोलकर व वेंगुर्ल्यातील आयकेअर ऑफ्टीकलचे कर्मचारी उपस्थित होते. महिला व मुलींच्या तपासणीनंतर मोफत चष्मे वाटप केले.

Leave a Reply

Close Menu