तालुका समितीतर्फे पत्रकार दिन

वेंगुर्ला तालुका पत्रकार समितीतर्फे ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी पं.स.सभापती अनुश्री कांबळी, जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा परब, पत्रकार समितीचे अध्यक्ष के.जी.गावडे, उपाध्यक्ष प्रदिप सावंत, सचिव दाजी नाईक, सदस्य मॅक्सि कार्डोज, आपा परब, एस.एस.धुरी, विनायक वारंग, अजय गडेकर, प्रथमेश गुरव, योगेश तांडेल, सूरज परब, जिल्हा सदस्य भरत सातोस्कर आदी उपस्थित होते. लोकशाहीच्या दोन्ही बाजूंचा विचार करुन वेंगुर्ल्यातील पत्रकार समाजास दिशा देण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन अनुश्री कांबळी यांनी तर वहात जाणा-या तरुण पिढीला योग्य मार्गावर आणण्याचे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन प्रज्ञा परब यांनी केले. जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार दिपेश परब याचा समितीतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

Leave a Reply

Close Menu