श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन

वेंगुर्ला होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा श्रमिक पत्रकार संघ व अॅड.दत्ता पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेंगुर्ला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कौलगेकर, सचिव सचिन वराडकर, खजिनदार सावळाराम भराडकर, प्राचार्य डॉ.के.जी.केळकर, उपप्राचार्या डॉ. पूजा कर्पे, डॉ.संजीव लिंगवत, डॉ.सतीश पाटील, डॉ. रविद्र बुरुड आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. सिंधुदुर्गातील मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर व हिंदी वृत्तपत्राचे जनक बाबुराव पराडकर या नर रत्नांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घेतल्यास आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो असे उद्गार डॉ.केळकर यांनी काढले. सुरेश कौलगेकर यांनी पत्रकारितेतील शिक्षणातील व रोजगारातील संधी याबाबत मार्गदर्शन व्यक्त केले.

Leave a Reply

Close Menu