जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान

जिल्हा पत्रकार संघ आणि सिधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस फाटा येथील इच्छापूर्ती गोविद मंगल कार्यालयात पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, जि.प.अध्यक्षा समिधा नाईक, जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, ज्येष्ठ विधिज्ञ अजित भणगे, जि.प.सदस्य अंकुश जाधव, पं.स.सदस्य सुप्रिया वालावलकर, ओरोस सरपंच प्रिती देसाई, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

      जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान असून समाज परिवर्तनाचे काम पत्रकार करीत असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात पत्रकारांच्या शिष्यवृत्ती, दहावी, बारावीतील गुणवंत मुलांचा स्कूल बॅग, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच संदिप गावडे, महादेव परांजपे, तेजस देसाई, दिपेश परब, अनिकेत उचले, दिनेश साटम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर या नावाने ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu