मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार सिधुदुर्गचे सुपुत्र, ज्येष्ठ कादंबरीकार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर करण्यात आला आहे. १ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी २७ फेब्रुवारीला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. साहित्यिकांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो. मराठी साहित्यातील हा सर्वोच्च पुरस्कार गणला जातो.

Leave a Reply

Close Menu