साहित्य परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी स्नेहा राणे-बेहरे

अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी  सौ.स्नेहा राणे-बेहरे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ.अ.ना. रसनकुटे आणि उपाध्यक्ष डॉ.अलका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. राणे यांची निवड झाली आहे. लेखिका स्नेहा राणे-बेहरे यांनी दोन अंकी चार नाटके लिहिली असून गेल्याचवर्षी त्यांचे लाँग जंपहे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत गिरगांव येथील साहित्य संघ मंदिरात सादर झाले. त्यांच्या लहान मुलांसाठी लिहिलेली नाटिका (मोबाईलचे फायदे-तोटे‘) वेंगुर्ला येथील शाळेत सादर केली आहे. किरात ट्रस्ट प्रकाशित देवाक काळजीया मालवणी कथासंग्रहाला अकोला येथील मालवणी बोलीभाषेचा व-हाडरत्न पुरस्कार मिळाला आहे. शहर आणि मीया कवितासंग्रहातील अनेक कवितांना राज्यस्तरीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत.

 

Leave a Reply

Close Menu