श्रीरामाच्या जयघोषाने दुमदुमले वेंगुर्ला शहर

मंदिर निर्माण निधी कार्यालयाचे उद्घाटन : बहुसंख्य रामभक्तांची उपस्थिती

        श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियान वेंगुर्ला कार्यालयाचे आज थाटात उद्घाटन झाले. यानिमित्त वेंगुर्ला शहरात भगवे झेंडे लावून काढलेल्या भव्य बाईक रॅलीने वेंगुर्ला शहर भगवेमय झाले होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी शहर दणाणून गेले.

      कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर बाईक रॅलीला सुरुवात झाली. पॉवर हाऊस, हॉस्पिटलनाका, बाजारपेठ मार्गे दाभोलीनाकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत बहुसंख्य रामभक्तांनी सहभाग दर्शविला. दाभोली नाका येथे सुरु करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर समर्पण अभियान वेंगुर्ला कार्यालयाचे उद्घाटन ह.भ.प.सावळाराम कुर्लेबुवा यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, अॅड.सूर्यकांत प्रभूखानोलकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे रविद्र परब, अनंत आठल्ये, स्नेहा कुबल, भापजा जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, अरुण गोगटे, आत्माराम बागलकर, बाबूराव खवणेकर, जिल्हा अभियान संयोजक सतीश घोटगे, वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक, सहसंयोजक मंदार बागलकर, नगरसेवक श्रेया मयेकर, साक्षी पेडणेकर, माजी नगरसेवक सुषमा खानोलकर यांच्यासह असंख्य रामभक्त उपस्थित होते. सतीश घोटगे यांनी राम मंदिर समर्पण अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली आणि या राम मंदिर बांधणीत केवळ निधी संकलन भाग नसून प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात राममंदिर पोहचले पाहिजे हा विषय असल्याचे सांगितले.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार बागलकर यांनी, प्रास्ताविक व आभार गिरीश फाटक यांनी केले.

Leave a Reply

Close Menu