महाआरोग्य शिबिरात ४०० जणांची तपासणी

आरोग्य सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम शिवसेना करते-पालकमंत्री सामंत

शासकीय वैद्यकीय रुग्णालयानंतर डॉक्टर उपलब्धता समस्या दूर होईल-खासदार राऊत

वेंगुर्ला तालुका शिवसेना व अथायु मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी शिबिरात तालुक्यातील सुमारे ४०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५ स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या टीमने हृदयविकार, हाडाचे विकार, मूत्र व किडनी विकार, कॅन्सर लक्षणे, सर्जरी व गेस्ट्रोएट्रोलॉजी व अन्य तपासणी केली. अधिक उपचार आवश्यक असल्यास कोल्हापूर येथे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

      आरोग्य सुविधा ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिवसेना म्हणून आम्ही काम करतो. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे स्वप्न होत त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला. केसरकर पालकमंत्री असताना महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आरोग्यासाठी सिंधुदुर्गात खर्च झाला. अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.

      शिबिराचा शुभारंभ खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, संफप्रमुख शैलेश परब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर जिल्हाप्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, रुची राऊत, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सुनील डुबळे, संदेश निकम, बाळा दळवी, महिला तालुका संघटक सुकन्या नरसुले, उपजिल्हासंघटक श्वेता हुले, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमंत चव्हाण, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, हृदयविकार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत माने, हाडांचे तज्ज्ञ डॉ.अनिल नाईकवडी, मूत्र व किडणीविकार तज्ज्ञ डॉ.राहुल पाटील, डॉ.सौरभ गांधी, डॉ.वजराठकर, युवासेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, नगरसेविका सुमन निकम, विवेक आरोलकर, मंजुषा आरोलकर यांच्यासहीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन वालावलकर यांनी केले.

      डॉक्टर उपलब्धता ही जिल्ह्यातील सर्वात मोठी समस्याच होती. मात्र यावर मुख्यमंत्री यांनी उपाय शोधून काढला व शासकीत वैद्यकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. येत्या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होईल त्यानंतर डॉक्टर उपलब्धता ही समस्या दूर होईल असे सांगत हे उत्कृष्ट आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल खासदार राऊळ यांनी वेंगुर्ला शिवसेनेचे कौतुक केले.

 

Leave a Reply

Close Menu