येत्या ८ ते १० दिवसात विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित

चिपी विमानतळावरील रस्ते, सुशोभीकरण, सुरक्षा यंत्रणा व अन्य बाबी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने आज पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी आय.आर.बी व जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली तसेच विमानतळाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, उपजिल्हा प्रमुख सुनील डुबळे, सचिन देसाई, आबा कोंडस्कर, बाळा दळवी, वेंगुर्ला तालुका शिवसेना प्रमुख यशवंत परब यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

          चिपी विमानतळ हवाई वाहतुकीसाठी सज्ज झाले असून काही तांत्रिक बाबीची पूर्तता झाल्यानंतर येत्या ८ ते १० दिवसांत विमानतळ उद्घाटनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लवकरच या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

      खासदार विनायक राऊत म्हणाले की, केंद्र सरकारचे हवाई उड्डाण मंत्री यांनी चिपी विमानतळ सुरु होण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असून विमानतळासाठी लागणा-या सर्व यंत्रणांची पाहणी करण्यासाठी दिल्लीतील एक पथक पाठविण्यात आले होते. त्यांची पाहणी पूर्ण झाली असून तशा प्रकारचा अहवाल हे पथक केंद्राला देणार आहे. त्या अहवालानुसार उर्वरित राहिलेल्या त्रुटींची पूर्तता आय.आर.बी करणार असून त्यानंतर केंद्राकडून हवाई वाहतूक सुरु करण्यासाठी मान्यता मिळणार आहे. कारण प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या गोष्टी महत्त्वाच्या असल्याने त्याची पूर्तता होणे गरजेचे आहे. या गोष्टी येत्या काही पूर्ण होणार असून लवकरच हवाई वाहतूक सुरु होणार आहे. नामकरणबाबत हिदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व बॅ.नाथ पै यांची नावे केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत. यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होईल. इंटरनेट सेवा शंभर टक्के पूर्ण झालेली असून याबाबत कोणतीही समस्या नाही असे सांगितले

      आमदार दिपक केसरकर यांनी चिपी विमानतळ विकासाचे दालन असणार आहे. शिवाय या भागातील असणारी बीचेस यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट केले.

Leave a Reply

Close Menu