रुढी, परंपरा जपणारा कीर्तन महोत्सव कौतुकास्पद – पोलिस निरीक्षक मोरे

वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान-वेंगुर्ला व श्रीदेव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग नवव्या वर्षी आयोजित केलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन येथील रामेश्वर मंदिरात झाले. 

        यावेळी व्यासपिठावर पोलिस निरिक्षक तानाजी मोरे, ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत रानडे, सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे, श्री रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दाजी परब, सचिव रवी परब, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळू देसाई, ब्राह्मण मंडळाच अनंत आठले, सुभाष मराठे, देवस्थान मानकरी वसंत परब आदी उपस्थित होते.

        सध्या युट्युब, व्हॉटस्अॅप, फेसबुकचा जमाना आहे. तरीही कीर्तनासारखे जुने रुढी, परंपरा जपणारे कार्यक्रम आयोजित केले जातात हे खूप कौतुकास्पद असल्याचे मत वेंगुर्ला पलिस निरिक्षक तानाजी मोरे यांनी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.

         हा कीर्तन महोत्सव २६ जानेवारीपर्यंत चालणार असून यात ह.भ.प.चारुदत्त बुवा आफळे हे ‘राजसूय यज्ञ‘, ‘संत नामदेव महाराज‘,  ‘अफजलखान वध‘ यावर कीर्तने सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण जोशी यांनी केले.

Leave a Reply

Close Menu