पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या विविध विकास कामांमध्ये नगराध्यक्ष दिलीप गिरप व तत्कालीन मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांना सहाय्यभूत असणा-या प्रशासकीय अधिका-यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शिवसेनेचे सुनील डुबळे, बाळा दळवी, संदेश निकम, सुमन निकम, तुषार सापळे, यशवंत परब, श्वेता हुले, सुनील मोरजकरअजित राऊळअस्मिता राऊळ, विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, विवेक कुबल, बाळा नाईक यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रवेशद्वारासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण केले.

          यावेळी उपोषणस्थळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी भेट देऊन तत्कालीन मुख्याधिकारी साबळे यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येईल. तसेच आपण कोकण आयुक्तांशी चर्चा केली असून या प्रकरणाची कमिशनर मार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या शिवसेना पदाधिका-यांनी आपले उपोषण मागे घेतले. या उपोषणाला संजय पडते, संदेश पारकरअँथोनी डिसोझा, दादा सोकटे, विवेक खानोलकर यांनीही भेट दिली.

 

Leave a Reply

Close Menu