ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाची १७ वर्षांपासूनची असलेली मागणी अखेर पूर्णत्वास आली असून वेंगुर्ला आगारातर्फे वेंगुर्ला-दाभोली-वेतरेमार्गे नृसिहवाडी अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेचा शुभारंभ २७ जानेवारी रोजी प्रभारी बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे जिल्हा सदस्य डॉ.राधाकृष्ण वेतुरकर व दीपक वेंगुर्लेकर यांनी ही बस सुरु करण्यासाठी २००३ सालापासून वेंगुर्ला आगार व विभागीय नियंत्रक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. ही बससेवा सुरु झाल्यानंतर राधाकृष्ण वेतुरकर यांनी निलेश वारंग यांचे सन्मानचिन्ह देऊन आभार व्यक्त केले. या बससेवेसाठी शाम गोगटे व दीपक वेंगुर्लेकर यांनी विशेष प्रयत्न केले. सदरची गाडी वेंगुर्ल्याहून दुपारी १२.४५ला तर नृसिहवाडीहून सकाळी ५.३०ला सुटते.

Leave a Reply

Close Menu