कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतील वेंगुर्ला तालुक्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ येथील ग्रामीण रुग्णालय व शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आला. शुभारंभाची पहिली लस वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंडित डवले यांना देण्यात आली. यावेळी जिल्हा रुग्णालयातील कोविड लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ.धर्मराज मिश्रा, वेंगुर्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.पी.डी. वजराटकर, नगराध्यक्ष  दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंडित डवले, डॉ.निलेश अटक, डॉ.प्रल्हाद मणचेकर, डॉ.राजेश्वर उबाळे, डॉ.के.जी.केळकर, ग्रामीण रुग्णालयाचे इनचार्ज श्वेता मांजरेकर, सिस्टर शालिनी अणसूरकर, विनीता तांडेल, आरोग्य सेवक राजेंद्रनाथ गोसावी, आरोग्य सहाय्यक डी.बी.मोरजकर आदी उपस्थित होते.

    ग्रामीण रुग्णालयात व शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक ९९ जणांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरणात ५२ महिला व ४७ पुरुषांचा समावेश असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Close Menu