उभादांडा नवाबाग शाळा नं.१ च्या सभागृहाचा तसेच वेंगुर्ला-कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या पाच वर्गखोल्यासाठी ५३ लाख रुपये मंजूर असून या नुतन इमारतीचाही भूमिपूजन सोहळा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. नवाबाग येथे जि.प.सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, उपसरपंच गणपत केळुसकर, मुख्याध्यापिका तन्वी रेडकर, रामा पोळजी, मारुती गढूळकर, प्राजक्ता आपटे, रामचंद्र आरावंदेकर, नारायण तारी, उत्तम आरावंदेकर, श्यामसुदर कोळंबकर, वैष्णवी केळुस्कर, अक्षरा गोकरणकर, वसंत तांडेल आदी उपस्थित होते. प्राथमिक शाळांची दिवसेंदिवस कमी होणारी पटसंख्या ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे ही पटसंख्या वाढवण्यासाठी काय करता येईल याकडे जिल्हा परिषद, शिक्षक, पालक आणि लोकप्रतिनिधी या सर्वांनीच एकत्र येत विचार करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.

     तर शिवाजी प्रागतिक शाळा येथे विक्रम गावडे, सुरेंद्र चव्हाण, रवी शिरसाट, मुख्याध्यापिका संजिवनी कांडरकर, अंगणवाडीच्या स्मिता कोणेकर, शिक्षिका अरुणा देसाई, मेधा कालमेग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जगताप, अशोक आरोलकर, पं.स.चे कर्मचारी मुकूल सातार्डेकर, महेश नाईक, जयराम वायंगणकर, सेवानिवृत मुख्याध्यापक सत्यवान पेडणेकर आदी उपस्थित होते. शिवाजी प्रागतिक शाळेच्या शिक्षक, पालकांनी अंगणवाडीसाठी वर्गखोलीची आपल्याकडे मागणी केली असून मंजूर पाच वर्गखोल्यांचे बांधकाम चालू असतानाच आपण अंगणवाडी वर्गखोलीसाठीही निधी मंजूर करेन असे आश्वासन आमदार राणे यांनी दिले.

 

Leave a Reply

Close Menu