पेट्रोल, डिझेल दरवाढीचा वेंगुर्ला शिवसेनेच्यावतीने निषेध

      वेंगुर्ला शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तहसिल कार्यालयावर मोर्चा काढत भाजप केंद्र सरकारचा निषेध असो,‘ ‘पेट्रोल डिझेल दर कमी करानाय तर खुर्च्या खाली करा‘ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. कोरोना संकट काळात अनेकांच्या नोकरी धंद्यावर गदा आली. रोजगार बुडाले संसाराची विस्कटलेली घडी कशी बसवावी या चिंतेत देशातील सर्वसामान्य माणूस असताना सतत होणा-या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. पेट्रोलडिझेल कोणत्याही क्षणी शंभरी गाठण्याच्या स्थितीत असून महागाईचा भडका आणखीनच उडेल या चिंतेने देशातील सर्व जनतेत असंतोष पसरला आहे. शिवसेना या देशातील सर्वसामान्य नागरीकांच्या महागाई विरोधात पाठीशी ठामपणे उभी असून पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात हे आंदोलन छेडत आहोत. जगात सर्वाधिक पेट्रोलडिझेल दर हे भारत देशातच आहेत. मोदी सरकार आल्यापासून सतत पेट्रोलडिझेल दरवाढ सुरुच आहे. कोणत्याही परिस्थीतीत सर्वसामान्य माणसांना दिलासा द्यायचा नाही अशीच केंद्र सरकारची निती निदर्शनास येते. महागाईच्या या भडकणा-या वणव्यातून सर्वसामान्यांना बाहेर काढण्यासाठी शिवसेना नेहमीच तत्पर आहे. तरी सतत होणा-या पेट्रोलडिझेल दरवाढीबाबत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विचार करून केंद्र सरकारने पेट्रोलडिझेल वाढ तात्काळ कमी करुन जनतेला दिलासा देण्याचे काम करावे अन्यथा जनतेमध्ये उद्रेक झाल्यास सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल. लोकांना संकटाच्या खाईत केंद्र सरकारने लोटू नये भविष्यात होणा-या परीणामास केंद्र सरकारला जबाबदार का धरु नयेअशा आशयाचे निवेदन यावेळी वेंगुर्ला शिवसेनेच्यावतीने आज तहसिलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आले.

      यावेळी तालुकाप्रमुख यशवंत परबउपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्करसुनिल डुबळेमहिला आघाडी प्रमुख सुकन्या नरसुलेशहर प्रमुख अजित राऊळमाजी सभापती सुनिल मोरजकरविवेक आरोलकरपंकज शिरसाटमंजुषा आरोलकर यांच्यासह तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu