पंचद्रविड पतसंस्थेची सभा संपन्न

पंचद्रविड ब्राह्मण सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी या संस्थेची ८७वी वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष रविद्र ओगले यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारी रोजी साई डिलक्स हॉलवेंगुर्ला येथे संपन्न झाली.        

          सभेचे उद्घाटन ब्राह्मण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अनंतराव आठलेसुगंधा आठलेश्रीकांत रानडेडॉ.के.जी.केळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन झाले. कार्यकारी मंडळ व उपस्थितांचे स्वागत ब्राह्मण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण गोगटे यांनी तर व्यासपिठावरील संचालक मंडळ रविद्र ओगलेशिवप्रसाद कोळंबेकरप्रदिप जोशीमाधव मराठेप्रकाश गोगटेविवेक मुतालिकसीमा कुलकर्णीनेहा पुराणिकश्रीपाद गिरसागरविहंग देवस्थळीराजाराम चिपळूणकर यांचे स्वागत श्रीकांत रानडे यांनी केले. संस्थेचे दिवंगत सभासद तसेच संस्था वृद्धीसाठी सतत प्रयत्नशील राहणारे माजी अध्यक्ष कै.महेश्वर तथा तात्या रायकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेपुढील विषय पत्रिकेनुसार सभा झाली.   

      गतवर्षीच्या सभेचे इतिवृत्त वाचन तृप्ती गोखले यांनी केले. सभेत झालेल्या खुल्या चर्चेत अॅड.अजित गोगटेविजय मराठेबाळ पुराणिकनिलेश सरजोशीगोडबोले आदींनी सहभाग घेतला. संस्थेच्या कामाबद्दल शंकांचे निरसन करुन सभासदांनी केलेल्या सूचनांचा विचार करण्याचे ठरविण्यात आले.

     संस्थेचे वेंगुर्ला कक्ष चालक जगदीश गोडबोले (रा.पाल) यांनी ५१ सभासदांची नोंदणी केल्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष रविद्र ओगले यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. वेंगुर्ल्यात प्रथमच आयोजित केलेल्या या सभेला जिल्ह्यातून ३००हून अधिक सभासद उपस्थित होते. 

    सायकाळी याच ठिकाणी ब्राह्मण मंडळातर्फे वधु-वर सुचक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात नविन स्थळांचीही नोंद करण्यात आली.

Leave a Reply

Close Menu