आत्मनिर्भरसाठी ५ करोड नोक-या निर्माण करण्याचे ध्येय

केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील ५० क्लस्टर प्रकल्पांचे ऑनलाईन उद्घाटन २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र  राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-पेंडूर येथील कल्पतरु औद्योगिक सहकारी संस्थेचा समावेश होता. दरम्यान हा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम वेंगुर्ला महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी महिला काथ्या क्वायर क्लस्टरचे चेअरमन तसेच काथ्या प्रकल्पाचे मार्गदर्शक कृषीभूषण एम.के.गावडे, महिला काथ्या प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, कल्पतरु क्वायर क्लस्टरच्या चेअरमन अरुणा सावंत, उपाध्यक्ष श्रीमती परब, सचिव पेंडुरकर,सर्व संचालक, उपप्रादेशिक क्वायर बोर्ड अधिकारी श्रीनिवासन, विष्णू, गीता परब, श्रुती रेडकर, राखी करंगुटकर, वर्षा मडगावकर, सुजाता देसाई, छाया भाईप, रंजना कदम, प्रविणा खानोलकर, अश्विनी पाटील आदींसह सर्व एस.पी.व्ही.मेम्बर्स,महिला आदी उपस्थित होते.

    देशात १८ राज्यात एकाच वेळी ५० क्लस्टरची सुरुवात झाल्याने या व्यवसायाशी निगडीत ४२ हजार लोकांना रोजगार मिळणार असून त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरुवात होणार आहे. गावात रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने गावातील लोक मोठमोठ्या शहरात रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित झाले आहेत. यासाठी गावात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ५ करोड नोक-या निर्माण करण्याचे ध्येय असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केले. तसेच अमेझॉन प्रमाणे एमएसएमई व खादीग्रामोद्योगाचे वेबसाईटवर पोर्टल सुरु करण्याचा आपला विचार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu