३२ किलो चांदीचा वापर करुन कोल्हापूर येथे बनविलेल्या वेंगुर्ला येथील श्री सातेरीच्या नूतन चांदीची पालखी २४ फेब्रुवारी रोजी वेंगुर्ल्यात आणण्यात आली. त्यानंतर बॅ.खर्डेकर महाविद्यालय ते बाजारपेठ, दाभोली नाका, पिराचा दर्गा, रामेश्वर मंदिर मार्गे सातेरी मंदिर अशा मार्गाने ढोलताशांच्या गजरात काढलेल्या मिरवणूकीवेळी ठिकठिकाणी भाविकांनी पालखीचे व तरंगदेवतांचे दर्शन घेतले. 

Leave a Reply

Close Menu