शासनाच्या अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहिम सुरु

शासनाकडून होत असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, चारचाकी वाहने, व्यवसाय वा नोकरीपासून मिळणारे उत्पन्न याचा प्राधान्याने विचार करुन करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शिधापत्रिकेतील एखादी व्यक्ती मयत असून त्याचे नाव कमी केलेले नसेल किंवा लग्न होऊन गेलेल्या सदस्याची नाव कमी केलेली नसेल व त्या नावांवर रेशनचे धान्य जी शिधापत्रिकाधारक उचल करीत असेल तर संबधितांनी ती नावे आपल्या शिधापत्रिकेतून वगळून घ्यावीत. तसे न करणारे शिधापत्रिकाधारक आढळल्यास त्यांचेवर कारवाई करुन त्यांचेकडून संबधितांच्या नावे उचल केलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली करण्यांत येणार असल्याने प्रत्येक शिधापत्रिका धारकाने वेळीच आपली शिधापत्रिकापुरवठा विभागामार्फत तपासणी करुन घ्यावी असे आवाहन वेंगुर्ला तहसिलदार यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu